Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात कंत्राटी भरती निर्णयाच्या विरोधात निषेध आंदोलन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तात्कालिन महाविकास आघाडी (उबाठा) सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरच्या वतीने  काँग्रेस, उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला.

हे आंदोलन आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. याप्रसंगी अजय भोळे, शहराध्यक्ष परिक्षित बर्‍हाटे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, अमोल महाजन, संदिप दुबे, मनोज बियाणी, बापु महाजन यांच्यासह  भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी- मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा देऊन आंदोलन केले.

Exit mobile version