Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना, युवासेना व संभाजी ब्रिगेडतर्फे राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा निषेध (व्हिडीओ)

पाचोरा – नंदू शेलकर  | निवडणूक आयोगाने घाई घाईने शिवसेना पक्षाचे “शिवसेना” नाव व “धनुष्यबाण” निशाणी गोठविले आहे. याविरोधात पाचोरा – भडगाव शिवसेना, युवासेना व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात  जोरदार घोषणाबाजी करत रॅॅली काढत जाहिर निषेध नोंदविण्यात आला.

 

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने दबावाखाली येत घाई घाईने निर्णय घेऊन शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्ह गोठविल्याचा आरोप करत  पाचोरा – भडगाव शिवसेना, युवासेना व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आज दि. १० आॅक्टोबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत रॅॅली काढत जाहिर निषेध नोंदविला.

तसेच जाहिर निषेधार्थ उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, शहर प्रमुख शरद पाटील, शंकर मारवाडी (भडगाव), मा. जि. प. सदस्य उद्धव मराठे, उपजिल्हा युवा प्रमुख संदिप जैन, माधव जगताप (भडगाव), संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील, मा. नगरसेवक दत्तात्रय जडे, भरत खंडेलवाल, दादा चौधरी, पप्पु राजपुत, अजय पाटील, पप्पु जाधव, अतुल पाटील, हरिष देवरे, विजय पाटील, संजय चौधरी, धनराज पाटील, राजेंद्र राणा, विनोद पाटील सह मोठ्या संख्येने शिवसेना, युवासेना व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी  “५० खोके एकदम ओके”, “उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

 

Exit mobile version