Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकाराला मारहाण केल्याचा निषेध: अमळनेरात पत्रकार संघातर्फे निवेदन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आ. किशोर पाटील यांनी केलेल्या शिवीगाळ केल्याचा निषेध करत मारहाण करण्याऱ्या गुंडावर गुन्हा करून कठोर कारवाई करण्याची मागणी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे निवेदनाद्वारे प्रांत व तहसीलदारांना करण्यात आली आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्याआधी त्यांना आ. किशोर पाटील यांनी अर्वाच्च व शिवराळ भाषेत शिवीगाळ केली होती. त्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर लोकप्रतिनिधी इतकी खालच्या तऱ्हेची भाषा कशी वापरू शकतो असा प्रश्न संबंध महाराष्ट्राला पडला. ज्या गुंडांनी महाजन यांच्यावर हल्ला केला ते आमदारांचे समर्थक असल्याचा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दहशत निर्माण करणाऱ्या आ. किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रातील संपूर्ण पत्रकार संघटना एकत्र येवून उग्र आंदोलन करतील. कारण दुःख म्हातारी मेल्याच नाही परंतु काळ सोकावता कामा नये. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांची मुस्कटदाबी होत आहे. त्यामुळे या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.

 

सदरचे निवेदन प्रांताधिकारी महादेव खेडकर व तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांना करण्यात आली. सदर निवेदन देतेवेळी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत, सचिव चंद्रकांत पाटील, पत्रकार संजय पाटील, किरण पाटील, महेंद्र रामोशे, जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, आर जे पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, संभाजी देवरे, विजय पाटील, आबिद शेख, गणेश चव्हाण, विनोद पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version