Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद घर फोडून ४४ हजारांचा मुद्देमाल लांबविला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय गावात तरुणाचे बंद घर उघडून गोदरेज कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन श्रीकांत नारखेडे (वय-३०) रा. बेलव्हाय ता. भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कामाचे निमित्ताने ते घर बंद करून बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हे बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे रविवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता उघडकिला आले.

दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर चेतन नारखेडे याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक जाधव करीत आहे.

Exit mobile version