Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एफ-१६ विमान पाडल्याचे भारताकडे पुरावे – सीतारमन

 

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे जे एफ-१६ फायटर विमान पाडले. त्या विमानाचा वैमानिक कोण होता, त्याची ओळख काय आहे? त्याबद्दल भारतीय लष्कराकडे माहिती आहे, असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भारताने आतापर्यंत अनेकदा पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने मात्र त्यांचे एफ-१६ विमान पडल्याचे अदयाप मान्य केलेले नाही.

या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी प्रथमच केलेले हे विधान अत्यंत महत्वपूर्ण आहे. २७ फेब्रुवारीच्या सकाळी राजौरीच्या आकाशात भारत-पाकिस्तानच्या फायटर विमानांमध्ये डॉगफाईट झाली. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-२१ बायसन विमान पडले. पण त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमानही पाडले होते.

कारगिल युद्धाच्यावेळी पाकिस्तानने ज्या प्रमाणे आपल्या सैनिकांचे बलिदान मान्य केले नव्हते, तसेच ते आता सुद्धा आपले एफ-१६ विमान पडल्याचे आणि वैमानिक गमावल्याचे मान्य करणार नाही, असे निर्मला सीतारमन यांनी म्ह्टले आहे. पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाच्या वैमानिकाला पाकव्याप्त काश्मीरमधील गावकऱ्यांनी मारहाण केली व रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला, असण्याची शक्यता आहे, असेही सीतारमन म्हणाल्या.
पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा मानसिक छळ करण्यात आला. पण एवढे सर्व सहन केल्यानंतरही ते शांत असून त्यांचा जोश हाय आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. मी माझे कर्तव्य बजावले, आम्हाला अशा परिस्थितीसाठीच प्रशिक्षण दिले जाते, असे अभिनंदन यांनी सांगितल्याचे निर्मला सीतारमन म्हणाल्या.

Exit mobile version