Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘जलसंधारणातून मनसंधारण व्हावे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील केमिस्ट भवनात जलसंधारणातून मनसंधारण व्हावे यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

चाळीसगाव तालुक्यात वॉटर कप स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणातून मनसंधारण व्हावे यास्तव रांजणगाव विकास मंच,निंबाळकर फाउंडेशन व जलसाक्षर अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ जून रोजी सकाळी १० ते १ या दरम्यान शहरातील केमिस्ट भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्रमजीवींचे मते,मतांतरे जाणून घेत उदभवलेल्या अडचणी व समस्या तसेच भविष्यकालीन नियोजन या विषयावर प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून यात चर्चा व संवाद साधला जाणार आहे. या चर्चासत्राला सर्वांनी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन रांजणगाव विकास मंच,निंबाळकर फाउंडेशन व जलसाक्षर अभियान यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Exit mobile version