Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कळमसरे येथे रोगनिदान मोफत आरोग्य शिबीर उत्साहात

parola

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा येथे रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे सर्व रोगनिदान मोफत आरोग्य महाशिबीराचे आयोजन कळमसरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले असून शिबीराचे उद्घाटन स्नेहदीप गरुड यांच्या हस्ते करण्यात आले होते. या शिबीरात सुमारे 500 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

डॉ. निलेश चांडक यांनी कॅन्सरविषयी माहिती दिली. नागरिक, रुग्णांनी कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.अमेय कोतकर यांनी अँलर्जी संबंधित काळजी कशी घ्यावी, जेणेकरुन स्वतःचे इन्फेक्शन घरातील दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही, याबाबत मार्गदर्शन केले. स्वच्छतेसाठी घरगुती उपाय याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना बोलवून प्रात्यक्षिक करुन दाखवले.

कळमसरा गावात या शिबिराचे आयोजन करणारे कळमसरा गावचे सुपुत्र व रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टचे विद्यमान अध्यक्ष विनोद भोईटे यांचा गावच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कळमसरा गावासाठी जिल्हा परिषद शाळेसाठी ई-लर्निंग शिक्षण मिळावे, यासाठी डिजिटल बोर्ड, साहित्य तसेच गावासाठी शुद्ध पाण्याचे एटीएम बसवून देण्यात येईल, यासाठी प्रस्ताव रोटरी क्लबकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी डॉ. श्रीधर पाटील हे होते. यावेळी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक, बालरोग तज्ज्ञ डॉ. अमोल शेठ, दंतरोग तज्ज्ञ डॉ.राहुल भंसाळी, त्वचारोग तज्ज्ञ डॉ.अमेय कोतकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.श्रद्धा चांडक, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.पंकज शहा, जनरल सर्जन जगमोहन छाबडा, डॉ.मनीषा पाटील, डॉ.मयुरी पवार, डॉ.सुमन लोढा यांच्यासह सरपंच सविता निकम, मुख्याध्यापक शिवाजी देशमुख, समाधान पाटील, संतोष पाटील, शेखर चौधरी, धनराज रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गांधी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. छाया पाटील, योगिता चौधरी यांनी केले. याप्रसंगी अरविंद देशमुख, गणपती अँडचे संचालक ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टचे सदस्य, कळमसरा येथील समाधान पाटील, शेखर चौधरी, विनोद निकम, धनराज रोकडे, मंगेश चौधरी, प्रमोद चौधरी, गौरव रोकडे यांच्यासह नागरिकांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version