Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अर्जेंटिना येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत यांचा प्रा.डॉ.सुनील नेवे राहणार सहभाग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भालोद येथील कला व विज्ञात महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे हे नुकतेचे अर्जेटिना या देशाची राजधानी ब्युनोस एअर येथे होत असलेल्या अंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.

इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या २७ व्या वर्ल्ड काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी भुसावळ येथून रवाना झालेले आहेत. १५ जुलै-१९ जुलै रोजी दरम्यान युनिव्हर्सिटी ऑफ कॅटोलिका अर्जेंटिना येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रा. डॉ. सुनील नेवे हे “रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा भारताच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक पैलूंवर झालेल्या परिणामांचा अभ्यास” या विषयावर शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सेक्रेटरी नितीन चौधरी, अमोल जावळे, दिलीप चौधरी, हेमलता इंगळे, मोहन चौधरी, नारायण चौधरी, नितीन चौधरी, लीलाधर चौधरी, किशोर महाजन, गणेश नेहेते, अरुण चौधरी, भास्कर पिंपळे, मधुकर परतणे, इच्छाराम चौधरी तसेच सर्व पदाधिकारी ,सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे, उप प्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, प्रा.जतिन मेढे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Exit mobile version