Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एनएमयुसीटीओ प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.ए. डी. गोस्वामी यांची निवड

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील नाहाटा महाविद्यालयातील स्थानिक शाखा एनएमयुसीटीओ प्राध्यापक संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर नुकतीच जाहिर झाली असून भुसावळ कला, विज्ञान आणि पी .ओ .नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील उपप्रार्चाय प्रा .डॉ .ए डी गोस्वामी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक कार्यक्रमापूर्वी सर्वप्रथम स्थानिक शाखेचे माजी सचिव डॉ. एस .पी. झनके  यांनी सभागृहासमोर इतिवृत्त मांडले त्यात मागील दोन वर्षात संघटनेची वाटचाल लेखाजोखा संघटनेने मिळवलेले यश त्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्राध्यापक संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणीचे उपाध्यक्ष सिनेट सदस्य प्रा. ई. जी. नेहेते यांनी प्राध्यापक संघटनेने केलेल्या कार्याचा इती वृत्तांत मांडला. त्यात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ यांनी शासनाबरोबर वेळोवेळी भेटी घेऊन प्राध्यापकांचे प्रश्न सोडविले काही प्रश्न सुटले असून काही प्रश्न बाकी आहेत. परंतु आपण सकारात्मक विचाराचे आहोत लवकरच प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधि सभेतील घडामोडींवर प्रकाश टाकला.

विद्यापीठात उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक  विद्यापीठाचे आधारस्तंभ असतात परंतु नवीन कायद्याने आपले नेतृत्व कमी केले आहे. त्यानंतर स्थानिक  शाखेतील ज्या प्राध्यापकांनी गेल्या दोन वर्षात विशेष प्राविण्य मिळविले ज्यांची विद्यापीठाच्या विविध प्राधी करावर निवड झाली. प्राध्यापक पदी पदोन्नती झाली, अशा प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. ई. जी. नेहेते यांची महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपप्राचार्य प्रा. एस. व्ही .पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. एस .व्ही. पाटील यांनी सभागृहासमोर कार्यकारिणी सदस्यांची पदे वाचून दाखवली व सभागृहाला अधोरेखित केले की आपल्या महाविद्यालयाचे परंपरा निवडणूक नाही ज्या प्राध्यापकांना स्वेच्छेने कार्यकारिणीवर काम करायचे आहे जे प्राध्यापक प्राध्यापकांचे प्रश्‍न मिटविण्यासाठी वेळ  देतील अशा प्राध्यापकांनी पुढे यावे व त्यात सर्वानुमते येत्या दोन वर्षासाठी नवीन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यात अध्यक्ष उपप्राचार्य प्रा .ए. डी. गोस्वामी, उपाध्यक्ष प्रा . एस पी झनके, सचिव प्रा. प्रमोद अहिरे, सहसचिव, प्रा. अनिल हिवाळे, खजिनदार प्रा.डॉ. किरण वारके, अंतर्गत हिशोब तपासणीस डॉक्टर ममताबेन पाटील,  जिल्हा  प्रतिनिधी प्रा. जे .एफ. पाटील, केंद्रीय प्रतिनिधी प्रा. ई. जी .नेहेते, महिला प्रतिनिधी प्रा. स्मिता चौधरी, सेवानिवृत्त प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. सुधीर नेहेते, यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर मावळते अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात गेल्या दोन वर्षात प्राध्यापक संघटनेने उभे केलेले आंदोलन व त्यात मिळवलेले यश यात प्रकाश टाकला

शेवटी मावळते सचिव प्रा. एस. पी. झनके यांनी नवीन कार्यकारिणीकडे कार्यकारिणीचे दप्तर सुपूर्त केले व कार्यकारिणीची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी स्थानिक शाखेला सभा घेण्याची परवानगी देऊन सभागृह उपलब्ध करून दिले त्या बद्दल आभार मानले.

 

Exit mobile version