Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रो कबड्डी लीग : गुजरात फॉर्च्युनजायंट्सने मारली बाजी

pro kabbadi

मुंबई प्रतिनिधी । प्रो कबड्डी लीगमधील अत्यंत स्पर्धात्मक सामन्यात गुजरात फॉर्च्युनजायंट्सने दिल्लीचा ३१-२६ ने पराभूत करुन आपल्या यशाचे शिखर उंचावले आहे. दिल्लीचा या सत्रातील पहिला पराभव ठरला असून गुजरातने सलग तिसरे यश मिळवले आहे.

पहिल्या सत्रात ११-१४ ने पिछाडावर राहिलेल्या गुजरात फॉर्च्युनजायंट्सने दुसऱ्या सत्रात आपला खेळ उचांवत आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. गुजरातकडून जी.बी.मोरे याने अष्टपैलू कामगिरी करताना ९ गुणांची कमाई गेली. तर त्याला रोहीत गुलीया (८ गुण) चांगली साथ दिली. दबंग दिल्ली कडून स्टार खेळाडू नवीन कुमारने १० गुणांची कमाई केली. त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. दोन्ही संघ एकदा ऑल आऊट झाले. गुजरातने चढाई करतांना १७ गुण मिळविले तर दिल्लीला १३ गुण मिळवता आले. हा सामना अपेक्षेपेक्षा चुरशीचा झाला. गुजरातच्या धडाक्यापुढे दिल्लीचा टिकाव लागणार नाही, असा कयास असतांना दिल्लीच्या खेळाडूंनी गुजरातला चांगलीच लढत दिली. नवीनकुमारने गुजरातच्या बचावफळीच्या उणिवा उघड केल्या. सामन्याच्या शेवटच्या 7 मिनिटापर्यंत सामना दोन्ही बाजूला झुकत होता. मात्र दिल्लीचा बचाव कमकुवत ठरल्याने गुजरातच्या खेळाडूंना त्याचा फायदा झाला आहे.

Exit mobile version