राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेचे बक्षीस वितरण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी “मुलांतील नेतृत्वगुण संपन्न व्हावे म्हणून पालक पाल्यांसोबत उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.” असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी केले.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दयानंद कुमार यांनी आपल्या मनोगतात खान्देशात पाच स्क्वॅश कोर्ट एवढ्या कमी कालावधीत उभारणे आणि त्याला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला याबद्दल मला आनंद होत आहे.आता अधिक प्रॅक्टिस करा आणि राज्य, राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवा अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमात केसीई सोसायटी सदस्य ॲड.प्रमोद पाटील, नगरसेवक  नितीन बरडे, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे,  महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सहसचिव व महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे सचिव दयानंद कुमार, प्रशासकिय अधिकारी शशिकांत वडोदकर, जळगांव जिल्हा हॉशी स्क्वैश असोसिएशनचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, महाराष्ट्र राज्य फ्लोअरबॉल संघटनेचे सचिव रविंद्र चोथवे, तांत्रिक समिती सदस्य संदीप जगताप आणि एन के.पाटील आदींची उपस्थिती होती.

 

बक्षिस वितरण –

 

11 वर्षाखालील मुलं (एकल) –

प्रथम  – विवेक शिंदे, उस्मानाबाद

द्वितीय  – विनय शिंदे, उस्मानाबाद

तृतीय  – कवण सोनी, जळगाव

 

11 वर्षाखालील मुली (एकल) –

प्रथम – वसुंधरा नागरे, उस्मानाबाद

द्वितीय – ईशा शेळके, औरंगाबाद

तृतीय – दिक्षा हिरे, नाशिक

 

13 वर्षाखालील मुले (एकल) –

प्रथम – आदित्य घोडके, औरंगाबाद

द्वितीय – सुयश अडे, उस्मानाबाद

तृतीय – इंद्रज बडगुजर, अमरावती

 

13 वर्षाखालील मुली (एकल) –

प्रथम – राधिका ईजाते, परभणी

द्वितीय – ईशा शेळके, औरंगाबाद

तृतीय – कुहू पारक, पुणे

 

13 वर्षाखालील मुले (एकल) –

प्रथम – पार्थ शेळके, औरंगाबाद

द्वितीय – स्वर साबू, अमरावती

तृतीय – इंद्रेश बडगुजर, अमरावती

 

15 वर्षाखालील मुली (एकल)  – 

प्रथम – मिर्झा अश्मिरा बेग, औरंगाबाद

द्वितीय – सई इजाते, परभणी

तृतीय – ऋचा वराळे, औरंगाबाद

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत केसीई सोसायटी प्रशासकीय अधिकारी शशिकांत वदोडकर यांनी व्यक्त केले. आभार डॉ.रणजित पाटील व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय जिम्नेस्टिक्स प्रशिक्षक प्रा.निलेश जोशी यांनी केले.

Protected Content