Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

के.सी.ई.अभियांत्रिकीमध्ये आंतर महाविद्यालयीन ‘पोस्टर मेकिंग स्पर्धे’चे बक्षीस वितरण

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील के. सी. इ. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात एम.बि.ए. विभागातर्फे आंतर महाविद्यालयीन पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

ह्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. सर्व विजेत्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी व अकैडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार,  व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा.हर्षा देशमुख यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. ‘आज़ादी का अमृत महोत्सव, वसुंधराचे रक्षण, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, इ-वेस्ट मैनेजमेंट’ हे या स्पर्धेचे विषय होते.

सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर व सुरेख चित्र रेखाटले होते. या स्पर्धेत एकूण २२ महाविद्यालयांनी भाग घेतला. पदवी महाविद्यालय अंतर्गत अश्विनी चिखलकर, के.सी.ई.अभियांत्रिकी यांनी प्रथम, पियूष बड़गुजर, ओजस्विनी फ़ाईन आर्ट द्वितीय तर कोयल कोळी जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय यांनी तृतीय- क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

पदव्युत्तर महाविद्यालय अंतर्गत प्रथम पारितोषिक आदित्य सावले, द्वितीय- तृप्ती पाटिल आणि तृतीय पारितोषिक कल्पेश अमृतकर सर्व के.सी.ई. व्यवस्थापन महाविद्यालय यांनी पटकावले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा.श्वेता माळी ह्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सिमरन कौर आणि आभार प्रदर्शन प्रा.प्राची ओझा यांनी केले. यावेळी सर्व व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी व उपप्राचार्य संजय दहाड ह्यांनी सर्वांचे अभिनदन केले.

Exit mobile version