Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विकास कामांना प्राध्यान्य देणार; नवनिर्वाचित सदस्यांचा निर्धार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या सरपंच व उपसरपंच याचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या पंचवार्षीक सार्वत्रीक निवडणुकीत गावातील गावंकऱ्यानी दिलेल्या विश्वासाला तळा जावू देणार नाही व आम्हास मिळालेल्या संधीचे सोनं करून गावाच्या विकासासह विविध समस्यांचा आढावा घेऊन सर्वाचा सहकार्याने गावात विकास कामे करु, अशी ग्वाही नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच यांचे पती समाधान मंगल सोनवणे यांनी सत्कार प्रसंगी बोलताना सागीतले.

नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार संदिप सोनवणे यांच्या मित्र परीवार मार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी वढोदा सरपंच व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप सोनवणे यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी विकासोचे चेअरमन प्रमोद सोनवणे, लहु सोनवणे, मगंल सोनवणे, माजी उपसरपंच समाधान सोनवणे, यूवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान पाटील, बाळू पाटील, अनिल भालेराव, लताताई पाटील, मीनाबाई चौधरी, वंदनाताई भालेराव उपस्थित होते. गावात रखडलेल्या समस्या, घरकुल योजनांसह सर्वसामान्य जनतेला पाणी, वीज, गटार व शिक्षणावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी सागितले.

Exit mobile version