Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधान सर्वात मोठे रामभक्त; श्रीरामांसाठी ११ दिवसाचा कडक उपवास प्राणप्रतिष्ठेदिवशी सोडला

अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवसांचा उपवास केला होता. परंतु त्यांना राम मंदिर ट्रस्टकडून फक्त तीन दिवसांचा उपवास करण्याचे सांगितले होते. महाभारतात सर्वात कठोर तप उपवास म्हटले गेले आहे. मोदी यांनी ते तप पूर्ण केले. असा राजकर्त्या मिळणे हे आपले भाग्य आहे. नरेंद्र मोदी यांनी हे तप कसे केले? याची माहिती गिता परिवाराचे संस्थापक आणि राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंदगिरी महाराज यांनी दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करत चरणामृत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपवास सोडला. असा रामभक्त होणे नाही…असे गोविंदगिरीजी महाराज यांनी सांगितले.

देशभरातील महापुरुषांशी चर्चा करुन आम्ही नरेंद्र मोदी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी तीन दिवसांचे उपवास करण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी अकरा दिवसांचे कठोर उपवास केले. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. महाभारतानुसार उपवास हे सर्वात मोठे तप आहे. हे तप करणारा नरेंद्र मोदी यांच्यासारखा तपस्वी राष्ट्रीय नेता मिळणे सोपे नाही. आम्ही त्यांना या दिवसांत विदेश प्रवास करण्याचे नाही म्हटले होते. त्यामुळे त्यांनी विदेश प्रवासही टाळला. परंतु देशाचा तिर्थस्थळांचा प्रवास केला. हा प्रवास नाशिकपासून सुरु केला. त्यानंतर रामेश्वरम गेले. देशातील तिर्थस्थळांवर असणाऱ्या दिव्य आत्मांना बोलवून अयोध्यात या सोहळ्यासाठी आणले. आम्ही मोदी यांना तीन दिवस भूमी शयन करण्याचे सांगितले. परंतु त्यांनी अकरा दिवस भूमीशयन केले.

गोविंदगिरी महाराज यांनी शिवाजी महाराज यांच्या तपाची आठवण करुन दिली. शिवाजी महाराज यांनी सर्व धार्मिक परंपरा पूर्ण केल्या होत्या. शिवाजी महाराज एकदा श्रीशैलम येथे गेले होते. तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला होता. त्यावेळी शिवाजी महाराज संन्यास घेण्याचे म्हणत होते. परंतु त्यांच्या सर्व मंत्र्यांनी त्यांना परत आणले. तसेच नरेंद्र मोदी यांना भगवती देवीने हिमालयातून पाठवले. त्यांना देशसेवेचे कार्य दिले. आपणास असा श्रीमंत योगी मिळाला आहे, असे गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चरणाअमृत देऊन हजारो जणांसमोर त्यांचा उपवास सोडला.

Exit mobile version