Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधानांनी केली भाजप खासदारांची कान उघडणी !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप खासदारांच्या बैठकीत संसदेतील उपस्थितीवरून त्यांची कान उघडणी केली. संसदेतील उपस्थिती आवश्यक असून यासोबत जनहिताची कामे करण्याचे त्यांनी सांगितले.

संसदेत उपस्थित राहण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना खासदारांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले की, संसदेत हजर राहण्याबाबत दरवेळी सांगणे योग्य वाटत नाही. लहान मुलांनाही एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर त्यांना वाईट वाटते. तुमच्यात परिवर्तन घडवून आणा, अन्यथा परिवर्तन आपोआप येउ शकते, असा अप्रत्यक्ष इशाराही पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना दिला.

मोदी पुढे म्हणाले की, संसदेत कामकाजावेळी हजर राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी वारंवार भाजप खासदारांना केलेले आहे. तथापि कामकाजातील पक्षाच्या खासदारांची उपस्थिती नगण्य होत चालली आहे. खासदारांनी सूर्यनमस्कार करावे. सूर्यनमस्काराची स्पर्धा करावी. यामुळे आरोग्य चांगले राहील, असा सल्ला मोदी यांनी दिलातसेच खासदारांनी आपल्या भागातील क्रीडा अभियान एका महिन्यात संपवू नये, तर प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या स्वरूपाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

 

Exit mobile version