Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला ‘मन की बात’

PM 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला ‘मन की बात’ हा कार्यक्रम ३० जून रोजी प्रसारित होणार आहे.

 

ट्विटर, फेसबुक किंवा नमो अॅपवरून आगामी कार्यक्रमांची सूचना देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी इन्स्टाग्रामवरून ‘मन की बात’ कार्यक्रमाची माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की, ३० जून रोजी सकाळी ११ वाजता आपण पुन्हा एकदा भेटूयात. रेडिओला धन्यवाद. १३० कोटी भारतीयांच्या भावना आणि सामूहिक सामर्थ्याची देवाण-घेवाण करूयात. मला विश्वास आहे की, आपणाकडेही खूप साऱ्या गोष्टी शेअर करण्यासाठी असतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी नमो अॅपवर आपल्या सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version