Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनाला अपघात

ce23f4f7 df6a 4e95 ae22 3d1ab1651f6b

 

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सामील होण्यासाठी जी.प. अध्यक्षा उज्वला पाटील या तातडीने मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाल्या होत्या. आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास नाशिक जवळील ओझर गावाजवळ त्यांच्या इनोव्हा गाडीला जबर अपघात झालाय. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कुणालाही जास्त लागले नाही.

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांचा जळगाव जिल्ह्यात दुष्काळी दौरा आहे. त्यामुळे जी प. अध्यक्ष उज्वला पाटील , पती माजी जी. प. अध्यक्ष मच्छिंद्र पाटील व परिवारासह त्या मुंबईहून रात्री बारा वाजता जळगावला येण्यासाठी निघाले. पहाटे ३ वाजेच्या सुमारास नाशिक जवळील ओझर गावाजवळ स्पीड ब्रेकरवर गाडी असताना मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक (up.555) ने जोरदार धडक दिली. त्यामुळे इनोव्हा गाडीचा भाग पूर्णतः चेपला गेला. मागच्या सिटवर बसलेला उज्वला पाटील यांचा भाचा सुदैवाने या भीषण अपघातात बचावला. तर किरकोळ दुखापत वगळता कुणासही मोठी दुखापत झाली नाही. वर्षभरापासून अध्यक्षायांच्या गाडीचा तिसऱ्यांदा अपघात झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून त्यांना कुठलीही इजा झाली नाही. अपघातातील ट्रॅक व चालक यांना ओझर पोलीस स्थानकात जमा करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version