Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युगांडा येथील आफ्रिकन देशांच्या परिषदेत एरंडोल नगरपालिकेचे सादरीकरण

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |  पहिली आफ्रिकन कृषी उद्योजकता आणि प्रादेशिक बाजारपेठ ही पूर्व आफ्रिकेतील देशांची परिषद आफ्रिकन दिनाच्या निमित्ताने युगांडा येथे संपन्न झाली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत एरंडोल नगरपालिकेला सहभागी होण्याचा बहुमान मिळाला.

२४ ते २६ मे २०२२ दरम्यान संपन्न झालेल्या या परिषदेत आफ्रिका खंडातील टाझानिया, केनिया ,युगांडा रवांडा, गुरंडी,  कांगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि दक्षिण संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेत एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी कंपोस्ट निर्मिती व त्यांचे आनुषंगिक फायदे याविषयी ऑनलाइन सादरीकरण केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नगरपालिकेच्या कामाचे मॉडेल सादर करण्याची संधी प्रथमच एरंडोल नगरपालिकेला मिळाली. एरंडोल नगर परिषदेने गेल्या वर्षभरापासून शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका असे योग्य वर्गीकरण करून पद्मालय रस्त्यावरील घनकचरा प्रकल्पामध्ये नियोजन पूर्वक प्रक्रिया चालू केलेली आहे. यातून तयार होणाऱ्या कंपोस्ट खतला महाराष्ट्र शासनाचे हरित मानांकन प्राप्त झाले असून या हरित खताची शेतकऱ्यांना नाममात्र दरात विक्री सुरू आहे अशाप्रकारे एरंडोल नगरपालिका उत्पन्न मिळवणारी महाराष्ट्रातील नगरपालिका आहे.

या सादरीकरणासाठी स्वच्छ महाराष्ट्र संचालनालय प्रो.जी.आय.झेड ‘इंडिया ओमकार’ शौचे राज्य समन्वयक स्वच्छ महाराष्ट्र मिशन यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version