प्रवीण जोशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

 पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था जळगाव तर्फे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक शिक्षक दिनानिमित्त पहूर येथील मूळ रहिवासी आणि शासकीय आश्रमशाळा कोहोर ता. पेठ जि. नाशिक येथील शिक्षक प्रवीण जोशी यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२०-२१” चे वितरण करण्यात आले. 

आदिवासी दुर्गम भागात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रविण  जोशी यांचा सत्कार जळगाव येथील डॉ. एन.एम.काबरा फाउंडेशनचे चेअरमन आणि होमिओपँथी तज्ज्ञ डॉ.महेंद्र काबरा व संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. ममता काबरा, ज्येष्ठ शिक्षक सुपडू लुल्हे, विजय लुल्हे, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वाघ आदी उपस्थित होते.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.