Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी महीला आघाडी यावल तालुकाध्यकपदी प्रतिभा निळ

यावल प्रतिनिधी | यावल येथील सौ .प्रतिभा गुणवत निळ यांची राष्ट्रवादी पक्षाच्या महीला आघाडी तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

जळगांव येथे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात दिनांक २२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी महिला आघाडीची संघटनात्मक बैठकीत आयोजित करण्यात आली होती, त्यात यावल तालुका अध्यक्ष म्हणून प्रतिभा गुणवंत निळं यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी महिला जिल्ह्यध्यक्ष वंदना चौधरी यांनी त्यांची निवड केली असून या बैठकीचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते प्रतिभा निळं यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. प्रतिभा निळं यांची ग्राप पंचायतवर सदस्य म्हणुन निवडून आल्या असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी व्यासपीठावर महिला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विजया पाटील यांचीही उपस्थिती होती .

मोहराळा ग्रा प सरपंच नंदा गोपाळ महाजन यांची महिला कार्याध्यक्ष, नीलिमा विजय धांडे यांची यावल शहराध्यक्ष आणि शामल भावसार यांची शहर कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावल तालुक्यातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.देवकांत पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रतिनिधी गिरधर पाटील ,आदिवासी आघाडीचे नेते एम बी तडवी, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सुखदेव बोदळे, यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, माजीउपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते, राष्ट्रवादीचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, यावल युवक शहर अध्यक्ष हितेश गजरे, समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे ,किशोर पाटील ,पवन पाटील, गिरीश पाटील, विनोद पाटील, भरत चौधरी, सागर सोनवणे यांचेसह जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र भैय्या पाटील, जेडीसीसी बँकेच्या संचालिका रोहिणीताई खडसे खेवलकर, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, रामदादा पवार, विनोद देशमुख, विजय पाटील, सौखेडा, जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, मंगला पाटील, फैजपूरचे शेख कुरबान आदींनी प्रतिभा गुणवंत निळं व महिला पदाधिकारी यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version