Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१ रुपया दंडाच्या निर्णयाला प्रशांत भूषण आव्हान देणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याने दोषी ठरवण्यात आल्याच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याने प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, तीन वर्षांसाठी वकिली करण्यापासून रोखण्यात येईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर प्रशांत भूषण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दंड भरण्यासाठी आपण आनंदाने तयार आहोत, मात्र निर्णयाला आव्हान देणार असं प्रशांत भूषण यांनी यावेळी सांगितलं. न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांना शिक्षा सुनावली.

पत्रकार परिषदेत प्रशांत भूषण यांनी सांगितलं की, “आनंदाने दंड भरण्यास तयार आहोत, मात्र आपल्याला दोषी ठरवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा मला हक्क आहे”. “माझे ट्विट कोर्टाचा अवमान करण्याच्या उद्धेशाने नव्हते तर मला जे वाटलं ते मी म्हटलं होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हा महत्त्वाचा क्षण होता आणि यामुळेच अनेकांना अन्यायाविरोधात बोलण्यात बळ मिळालं ”.

दरम्यान कोर्टाने निकाल दिल्यानंतर प्रशांत भूषण यांनी ट्विट करत न्यायालयाच्या निर्णयानंतर आपले वकील आणि ज्येष्ठ सहकारी राजीव धवन यांनी एक रुपयाचं योगदान दिलं असून आपण ते तात्काळ स्वीकारलं असल्याचं म्हटलं

Exit mobile version