Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रणाली चिकटे यांचा जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवास सुरु…

मुक्ताईनगर प्रतिनिधी । पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी, क्लायमेट चेंज या विषयावर जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सायकल यात्रा करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रणाली चिकटे ही एकटी निघाली. आज कुऱ्हा काकोडा या गावातून जळगाव प्रवास सुरू केला असून प्रणालीचा छोट्यासा सत्कार करण्यात आला. 

तसेच शेतीतील समस्या व त्यावर उपाय शोधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सायकल यात्रा करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रणाली चिकटे ही एकटी निघाली आहे. 20 ऑक्टोबर 2020 पासून तिची सायकल वारी सुरू झाली आहे. ती 4600 किमी च्या वर प्रवास करून खानदेश मध्ये  प्रवेश केला. तरी आज कुऱ्हा काकोडा या गावातून जळगांव प्रवास सुरू केला. त्या प्रसंगी प्रणालीचा छोट्यासा सत्कार करण्यात आला. त्या वेळी उपस्थित पं. स. सदस्य मु. नगर राजु भाऊ सवळे, ज्ञानेश्वर ढोले, निखिल भोलाणकर ,दोरकर सर, राजु सुरवाडे, भरत मदने, विनोद चौधरी व वंदना चौधरी ग्रामपंचायत सदस्य कुऱ्हा काकोडा. हे उपस्थित होते.

 

 

Exit mobile version