Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दीर्घ कोमातच

नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याचे त्यांच्यावर उपचार सुरु असलेल्या दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटललने कळवले आहे.

अद्यापही ते दीर्घ कोमात असून व्हेटिंलेटरवर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे. प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीबाबतचे सर्व महत्वाचे वैद्यकीय मापदंड स्थिर असल्याचेही रुग्णालयाने म्हटलं आहे. राजाजी मार्ग येथील घरी घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे ८४ वर्षीय मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती.

ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर मेंदू शस्त्रक्रियाही करण्यात आली. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. २१ ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करुन वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती.

Exit mobile version