Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड; गोव्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री

पणजी (वृत्तसंस्था) प्रमोद सावंत हे अखेर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसतील हे आता स्पष्ट झाले आहे. मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोघा आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे. घटक पक्ष त्यामुळे सावंत यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेनंतर सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय.

 

गोव्यात प्रमोद सावंत भाजपच्या सर्वात लोकप्रीय चेहऱ्यांपैकी एक आहेत. ते सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. उत्तर गोव्यातील सांखळी हा त्यांचा मतदार संघ आहे. सभापती आणि आता मुख्यमंत्री होणारे सावंत पेशाने एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.प्रमोद सावंत हे दोनवेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते. प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही घटक पक्षांनी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. ते देण्यास भाजप ब:याच चर्चेनंतर तयार झाला. मगोपकडे तीन आमदार असून त्या तिघांनाही नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल. गोवा फॉरवर्डच्याही तिघा आमदारांना मंत्रीपद मिळेल, असे भाजपच्या उच्चस्तरीय सुत्रंनी सांगितले. पर्रीकर सरकारमध्ये मगोपचे फक्त दोघेच मंत्री होते.

Exit mobile version