टोळी खुर्दच्या सरपंचपदी प्रमिला पाटील बिनविरोध

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टोळी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रमिला पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील टोळी खुर्द ग्रामपंचायतच्या सरपं पदाच्या निवडणुकीसाठी विस्तार अधिकारी आर के पटाईत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची सभा शुक्रवारी १५ जुलै रेाजी २०२२ रोजी पार पडली. या सभेत सरपंचपदासाठी प्रमिला रमेश पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

 

या सभेस ग्रामपंचायत सदस्य मनीषा मराठे, योगिता चव्हाण, कमलबाई भिल, कल्याणी मराठे, बाबासाहेब पाटील, उमेश मराठे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नवनिर्वाचित सरपंच प्रमिला पाटील यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

Protected Content