Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रल्हाद तोताराम महाजन याचं वृद्धापकाळाने निधन

अमळनेर प्रतिनिधी | कळमसरे ता. अमळनेर येथील कळमसरे विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष, माजी सरपंच, माळी पंच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व श्रीराम मंदिराचे विश्वस्त प्रल्हाद तोताराम महाजन वृद्धापकाळाने निधन झाले.

प्रल्हाद तोताराम महाजन (वय ८५) यांचे आज रविवार, दि.२७ रोजी रात्री ४.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते सेवानिवृत्त शिक्षक गुलाब तोताराम महाजन, डॉ. मोतीलाल तोताराम महाजन यांचे मोठे बंधू तर कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विकास प्रल्हाद महाजन, मारवड येथील सीनियर कॉलेजचे प्राध्यापक डॉ संजय प्रल्हाद महाजन यांचे वडिल होते.

प्रल्हाद तोताराम महाजन पंचक्रोशीतील नावारूपाला आलेलं एक वेगळे व्यक्तिमत्त्व होते, माळी समाजात जेष्ठ व्यक्ती होते. त्यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य मोठे प्रेरणादायी होते. कळमसरे विद्या प्रसारक संस्थेच्या जडणघडणीत त्यांची मोलाची कामगिरी होती. या संस्थेची स्थापना सन १९७५ साली झाली. स्थापनेपासून ते आजतागायत त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांची शैक्षणिक कारकीर्द पंचक्रोशीत नेहमीच स्मरणात राहील हे नक्की.

 

Exit mobile version