Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रलंबित कामांसाठी जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्या पुन्हा रद्द

police 1

जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुक आणि दिवाळीमुळे पोलीस प्रशासनाचे तपासाचे कामे कमी प्रमाणात झाले होते. मात्र प्रलंबित कामांसाठी सुट्या रद्द करून उर्वरित कामे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सुचना विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन यांनी आज काढले आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुका असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ड्यूटी लावण्यात आल्या होत्या त्यामुळे तपासाचे काम आणि नोंदणीचे काम थांबून होते. सोबतच दिपावली असल्याने पाचदिवसात अधिक कामांचा भर पडला आहे. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याभरापासून साप्ताहिक आणि इतर सुट्टया रद्द करण्यात आले होते. दरम्यान आत दिपावली व निवडणुका आटोपले तोच वरिष्ठांकडून पेंडन्सी कामे त्वरीत मार्गी लावा असे आदेश विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन यांनी आज काढले.

पोलीसांची डोकेदुखी वाढली
निवडणुकीत कोणत्याही रितीने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सु्ट्टया रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दिपावलीत देखील काही पोलीसांच्या संवेदनशिल भागात ड्यूटी लावण्यात आले. हे सर्व आटोपताच वरीष्ठांनी पोलीस विभागातील उर्वरित कामे तत्काळ पुर्ण करण्याचे आदेश दिल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा अधिक ताण वाढल्याने नाराजीचा सुर उमटत आहे.

Exit mobile version