Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रभासने जारी केले आदिपुरूषचे पोस्टर

मुंबई । महाबली फेम प्रभासने आपल्या आदिपुरूष या आगामी चित्रपटाचे पोस्ट जारी केले असून याला सोशल मीडियात जोरदार पसंती मिळाल्याचे दिसून येत आहे.

बाहुबली फेम तेलुगू सुपरस्टार प्रभासचे चाहते जगभर आहेत. विशेष करून बाहुबलीनंतर त्याला तेलगू चित्रपटाच्या पलीकडे ओळख मिळालेली आहे. आता तो तन्हाजी दी अनसंग वॉरियरफ चे दिग्दर्शक ओम राऊतसोबत काम करणार आहे. तो राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटात काम करणार आहे. प्रभासने स्वत: आपल्या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

मआदिपुरुषफ हा चित्रपट थ्रीडी अ‍ॅक्शन ड्रामा आहे. ओम राऊत हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. याचबरोबर प्रभासचा हा चित्रपट टी सेरीजचे संचालक भूषण कुमार निर्मित करणार आहे. हा सिनेमा २०२२ मध्ये हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड आदी भाषांमध्ये प्रदर्शित होईल. प्रभासने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

सोमवारी प्रभास आणि ओम राऊत यांनी लाईव्ह व्हिडीओतून चाहत्यांशी संवाद साधला होता. यानंतर या चित्रपटाचे पोस्टर समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यात प्रभासशिवाय आणखी कोणते कलाकार आदिपुरुष चित्रपटात दिसणार आहेत याची माहिती मात्र समोर आलेली नाही.

Exit mobile version