Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रभाकर सोनवणे यांच्या प्रचारास सुरुवात

WhatsApp Image 2019 10 08 at 11.38.17 PM

चोपडा, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील, तालुक्याची मुलुख मैदान तोफ शांताराम पाटील, प्रदिप पाटील ,जेष्ठ नेते आत्माराम म्हाळके, प्रदिप पाटील आदि पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रभाकर सोनवणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

बुधवार ९ ऑक्टोबर रोजी,सकाळी ८.०० वा. श्री.नाटेश्वर महादेव मंदिर लासुर,ता.चोपडा येथे अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांच्या निवडणूक प्रचाराचा दौऱ्यास शुभारंभ करण्यात आला. लासुर सकाळी ८.०० ते ९.३० ,चौगाव १०-११,चुंचाळे ११-१२,मामलदे -१२.२० ते १.०० येथे प्रचार करण्यात येत आहे.  याप्रसंगी विधानसभा मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य,सदस्या, सर्व पदाधिकारी ,जिल्हा- तालुका सर्व आघाड्या,सर्व मोर्चे,सर्व प्रकोष्ठ ग्रामिण व शहर शक्तिकेंद्र प्रमुख, विस्तारक, कार्यकारिणी,सर्व बाजार समिती , सर्व शेतकी संघ, तापी सह. सुतगिरणी संचालक, सर्व सक्रिय कार्यकर्ते, शाखाध्यक्ष,यांची कार्यक्रमाला उपस्थिती आहे.

Exit mobile version