Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोयखेडा दिगर येथील पोउनि शैलेंद्र पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित !

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील रहिवासी व सध्या मिराभाईदर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले शैलेंद्र हिलालसिंग पाटील यांना सनातर्फे उत्कृष्ट प्रशिक्षण कार्यासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

 

जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी व मूळचे मोयखेडा दिगर येथील रहिवासी सध्या मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय येथे कार्यरत असलेले डॉ. शैलेंद्र पाटील यांना नुकतेच गृहमंत्री पदक देऊन सन्मान करण्यात आले आहे

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय येथे झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते डॉक्टर शैलेंद्र हिलालसिंग पाटील यांना शासनातर्फे उत्कृष्ट कार्यासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पोलिस उपाधीक्षक मीनाक्षी राणे यांच्यासह पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ येथील अधिकारी अंमलदार आणि पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे दोनशे वीस महिला पोलीस प्रशिक्षणार्थीआदी उपस्थित होते.

 

डॉ. शैलेंद्र पाटील यांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत मध्ये महाराष्ट्रातील ११ पोलीस प्रशिक्षण केंद्रात वर्षी ऑल क्लास रूम प्रोजेक्टचे प्रमुख म्हणून काम केले असून त्यांनी संपूर्ण राज्यभर पोलीस प्रशिक्षण केंद्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण दिले आहे. या माध्यमातून त्यांनी चांगली कामगिरी बजावल्याबद्दल त्यांची दखल घेऊन त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. शैलेंद्र पाटील यांनी मुंबई शहर पोलीस प्रशिक्षण केंद्र मुंबई पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. गृहमंत्री पदक मिळाल्याबद्दल माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह जामनेर न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी आदींनी व जामनेर तालुका रशियाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version