Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘या’ गावात सुरू झाले पोस्ट ऑफीस !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे अत्याधुनीक संपर्काची साधने असतांनाही जनापासून दूर असलेल्या तालुक्यातील सहस्त्रलिंग या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे.

 

भारतीय डाक विभागातर्फे, भुसावळ विभाग भुसावळ, ४२५२०१ मधील सहाय्यक अधीक्षक  उपविभाग भुसावळ अंतर्गत आज दि. ०३रोजी सातपुडा पर्वत रांगांमधील दुर्गम भागात वसलेल्या सहस्रलिंग या गावात अधीक्षक डाकघर भुसावळ विभाग भुसावळ कुंदन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक अधीक्षक भुसावळ उपविभाग  अनुप गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहस्त्रलिंग या नवीन शाखा डाकघराचे सरपंच अरमान तडवी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले

 

या प्रसंगी गावाचे सरपंच अरमान तडवी, उपसरपंच  करीम तडवी, ग्रामसेवक राजेन्द्र तडवी, तसेच शाखा डाकघरा साठी जागा उपलब्ध करुन देणारे छबु तडवी व समस्त गावकरी उपस्थित होते.

 

सदर प्रसंगी अधीक्षक डाकघर कुंदन जाधव यांनी पोस्ट खात्याच्या अनेकविध योजना विषयी मार्गदर्शन केले व जगातील सर्वात विश्वसनीय अशा भारतीय डाक विभागाच्या डाकघरात आपली गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. सदर प्रसंगी डाक अधिदर्शक विनोद कासार यांनी दुर्गम भागात सुद्धा कशा पद्धतीने भारतीय डाक विभाग सेवा देण्यात तत्पर व समर्थ आहे याविषयी बोलून शाखा डाक घराच्या कार्याविषयी गावकर्‍यांना माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावचे मुख्याध्यापक सपकाळे गुरुजी यांनी केले.  या कार्यक्रमाप्रसंगी  भुसावळ विभागीय पदाधिकारी  कनकसिंग नरुका, कर्मचारी हेमंत कुरकुरे, किरण चौधरी, उपस्थित होते. शिवाजी पवार  यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी मेहनत घेतली.

Exit mobile version