Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात लोडशेडिंगची शक्यता

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्यात विविध संघटनेतर्फे दोन दिवशीय भारत बंदची हाक दिल्याने राज्यात ४८ तासानंतर लोडशेडिंग होण्याची दाट शक्यता आहे.

वेगवेगळ्या मागण्यासाठी राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगारांनी पाचे हत्यार उपसले आहे. तर दुसरीकडे 48 तासानंतर राज्यावर लोडशेडिंगचे मोठे संकट येऊन उभे ठाकले आहे. कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेल्याने कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे लोडशेडिंग करावी लागण्याची शक्यता आहे.

राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी व कामगार दोन दिवसीय म्हणजे २८ आणि २९ मार्च रोजी संपावर गेले आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपात कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेली आहे. त्यामुळे दोन दिवस कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. या संपामुळे देशपातळीवर वीजनिर्मिती प्रभावित होणार आहे. पारस, नाशिक व भुसावळ येथील वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. तसंच, कोराडी, खापरखेडा व चंद्रपूरचे वीज निर्मिती संच देखील प्रभावित होणार आहे. त्यामुळे राज्यात 48 तासानंतर लोडशेडिंगची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

Exit mobile version