राज ठाकरेविरुद्ध कारवाईची शक्यता

दुपारी पत्रकार परिषद घेणार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भोंगा विरुद्ध वातावरण तापले असून औरंगाबादच्या सभेत भाषणावर तसेच शिराळा कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात काढलेल्या अजामीनपात्र अटक वारंट नुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे नंतर भोंग्यावर हनुमान चालीसा लावणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वच मशिदीसमोर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर औरंगाबाद सभेचे तसेच शिराळा कोर्टाकडून अजामीनपात्र वारंट काढण्यात आले आहे. त्यामुळे  राज ठाकरे यांचेवर कारवाई ची शक्यता असून राज ठाकरे त्यापूर्वीच हे दुपारी पत्रकार परिषद घेणार असून मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावर दाखल झाले आहेत.

जळगावसह अन्यत्र  हनुमान चालीसा तर काही ठिकाणी भोंग्याविना अजान 
सकाळी अजानच्या वेळी जळगाव, नवी मुंबई, मुंबई, तसेच अन्य ठिकाणी राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हनुमान चालीसा लावण्यात आली. रात्रीपासूनच मुंबई ठाणे, कल्याण डोंबिवली आदी मोठया उपनगरातील मनसे पदाधिकाऱ्याना नोटीसा बजावत धरपकड करण्यात येत असून काही जणांना तडीपारीचे देखील आदेश देण्यात आले आहे. तसेच नाशिक मध्ये २५ ते ३० जणांना ताब्यात घेण्यात आले तर, औरंगाबादेत मनसेचे अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या आवाहनाचा परिणाम मुंबई उपनगरात माहीम, मुंब्रा, भिवंडी मालेगाव, पुणे, कोल्हापूर आदी मोठ्या शहरात सकाळी विना भोंग्याची अजान झाल्याचे दिसून आले.
तर बऱ्याच ठिकाणी समंजसपणे भोंग्याविना अजान झाली असल्याने त्या ठिकाणी हनुमान चालीसा लावण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. मात्र बहुतांश मशिदी समोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: