Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरे घेऊन जाणारा ट्रक ताब्यात ; गुन्हा दाखल

Possession of trucks carrying cattle

 

जळगाव प्रतिनिधी । कत्तलीसाठी अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रक पकडून ट्रकमध्ये निर्दयीपणे कोंबून भरलेले 15 बैलांची सुटका करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले असून तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नशिराबाद ते उमाळा रोडवर ट्रक क्रमांक (एमएच 04 एफयु 3323) मध्ये अवैधरित्या गुरे कत्तलीसाठी वाहून नेत असल्याची माहिती मिळताच, एमआयडीसी पोलीसांनी उमाळा फाटा अंजिठा रोडवर सापळा रचला. त्याचवेळी रात्री 12.45 वाजता नशिराबादकडून सदरील ट्रक आल्यानंतर, ट्रकला थांबवून चौकशी करण्यात आली असतांना त्यात तब्बल 15 बैल आढळून आले. बैलांना निर्दयीपणे बांधून कोंबण्यात आले होते. मध्यरात्रीच एमआयडीसी पोलीसांनी बैलांची सुटका करत त्यांना जीवनदान दिले आहे. याप्रकरणी चालक शेख गुफूर शेख इसा (वय-37) रा. फटी बरजाइ रोड धुळे, साबीर सुपडू शेख (वय-21) आणि शेख फरिद शेख नबी (वय-26) दोन्ही रा. वघारी ता. जामनेर यांना अटक करण्यात आली असून ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, विजय पाटील, किशोर पाटील, होमगार्ड परमेश्वर पाटील यांनी कारवाई केली. पो.कॉ. मुकेश आनंदा पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीसात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.

Exit mobile version