Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीला पाठविले अश्लील संदेश

nnnnnnnn

 

पुणे (वृत्तसंस्था) घरी फिजिक्स विषयाची शिकवणी घेणाऱ्या विद्यार्थिनीला एका इंजिनीअर शिक्षकाने अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, पिडीत विद्यार्थिनी पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात ‘बीसीए’ चे शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी मुलगी बारावीला असताना फिजिक्स विषयासाठी खासगी शिकवणीसाठी शिक्षक शोधत होती. ‘जस्ट डाइल’वरून चौकशी केल्यावर आरोपी संदीप कुमारचा नंबर तिला मिळाला होता. संदीप कुमारने घरी येऊन शिकवणी घेण्यास तयार झाला. काही दिवसातच दोघांची चांगली ओळख झाली. त्यानंतर त्याने मुलीशी जवळीक साधून एकेदिवशी त्याने लग्नाची मागणी घातली. पण मुलीने लग्नाला नकार देत पालकांना ही गोष्ट सांगितल्यावर शिकवणी बंद केली. त्यानंतर आरोपी मुलीला अश्लील मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रासलेल्या मुलीने आईच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार आता सुनील कुमारला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version