ठाण्यात देखील पोलखोल सभा होणार – सोमय्या

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –  येत्या काही दिवसात  मुंबई प्रमाणेच ठाण्यात देखील पोलखोल सभा होणार आहे. ठाण्यात जे विविध प्रकारचे घोटाळे आहेत, ते सर्व नागरिकांसमोर आम्ही आणणार असल्याचा इशारा भाजपचे किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

गेली अनेक वर्षे ठाणे महापालिकेत माफिया सेना सत्तेत आहे. ठाणे महापालिकेत देखील अनेक वर्ष घोटाळे झाले असून गेल्या पाच वर्षात जे घोटाळे झाले, त्याची काळी पुस्तिकाच भाजपा काढणार असल्याचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. राणा दाम्पत्याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर लीलावती रूग्णालयात जाऊन खा. नवनीत राणा आणि आ.रवि राणा यांची भेट घेतली.

दरम्यान, हिरेन प्रकरणात कोणकोण अधिकारी होते, ते उघड करणार असून आता एकच चार्जशीट दाखल झाली आहे, यापुढे अजून चार्जशीट दाखल होऊ शकतात. गेल्यावर्षी मनसुख हिरेन हत्याकांड घडवून हिरेन हे वसुलीखोर असल्याचे चित्र ठाकरे सरकारने तयार केले होते. हिरेन प्रकरणात कोणकोण अधिकारी होते ते उघड करणार, तसेच वाझें आणि प्रदीप शर्मा या दोघांना पोलीस सेवेत हटवल्यानंतर राजकारणातून पुन्हा पोलीस दलात आणणाऱ्यांची चौकशी केली जावी.

नगराळे यांची बदली का करण्यात आली? खा. नवनीत राणा आणि आ.रवी यांना आत टाकण्याची सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का? राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊच शकत नाही. ज्याने हा गुन्हा लावला त्यावर कारवाई करणार का? असे प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व प्रश्नावर संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी  उत्तर द्यावे, असे सांगत यासाठी आगामी आठवड्यात एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचा असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

Protected Content