Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम

WhatsApp Image 2020 01 13 at 8.42.22 PM

जळगाव, प्रतिनिधी | पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत बालकांना १९ जानेवारी रोजी महापालिकेच्या क्षेत्रात पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. या लसीकरणाचा लाभ घेण्याचे जाहीर आवाहन आयुक्त उदय टेकाळे यांनी शहरातील नागरीकांना केलेले आहे.

राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहीम व तसेच नियमीत लसीकरण विशेष इंद्रधनुष्य संदर्भात आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका समन्वय समिती (टास्क फोर्स) ची बैठक प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात छत्रपती शाह महाराज रुग्णालय येथे नुकतीच आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीप्रसंगी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी नियमित लसीकरण मोहीम विशेष इंद्रधनुष्यचा आढावा घेतला. तसेच रविवार १९ जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहीम ० ते ५ वयोगट बालकांमध्ये राबविण्यासंदर्भात सूचना दिल्यात. महापालिकेच्या  २५ तर खाजगी १९३ शाळेतील विद्यार्थ्यांना पल्स पोलीओ मोहिमेंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी शहरातील शाळेच्या परिसरात रॅली काढण्याची सूचना आयुक्त डॉ. टेकाळे यांनी दिल्यात. तसेच ज्या मुस्लीम भागात लसीकरणांबाबत गैरसमज आहेत अशा मशिद व मदरसांमध्ये तेथील धर्मगुरुंकडून जनजागृती करुन घेथून लसीकरण करुन घेणेबाबत सूचीत करण्यात आले. बैठकीस जागतिक आरोग्य संघटनेचे नाशिक विभागाचे सर्व्हालेन्स ऑफिसर डॉ. प्रकाश नांदापूरकर, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.रावलानी, डॉ.मनिषा उगले, डॉ. अविनाश भोसले, आदी उपस्थित होते.

Exit mobile version