पोलिसांनी आता खरी मर्दानगी दाखवावी- नितेश राणे

नाशिक, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मविआच्या नेत्यांविरोधात पोस्ट लिहिल्यास तात्काळ कारवाई केली जाते मात्र सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना करणाऱ्याविरुद्ध मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, पोलिसांनी आता खरी मर्दानगी दाखवावी, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

राज्यात हिंदूहृदयसम्राटाचा मुलगा मुख्यमंत्री असताना सोशल मिडीयावर शिवलिंग विटंबनात्मक पोस्ट केली जात आहे. या प्रकरणी अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात पोस्ट लिहिल्यास ताबडतोब कारवाई केली जाते. पवारांवर एका मुलीने पोस्ट केली तर तिला जेलमध्ये टाकण्यात आले आहे. आणि आता शिवलिंगाच्या ऐवजी हीच पोस्ट इतर धर्मियांबाबत असती तर दंगल घडली असती. आता पोलिसांनी आता खरी मर्दानगी दाखवावी असे आव्हान देत, हिंदू आहोत म्हणून शांततेत मोर्चे निघत असल्याचे भाजपा आ. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नितेश राणेंसोबत इतर हिंदुत्ववादी संघटनादेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी मीच कसा हिंदू आहे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री उद्या येणार आहेत. पण त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीची इतकी भीती की सकाळचे औषधदेखील त्यांना विचारल्याशिवाय मुख्यमंत्री घेत नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली.

राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री असताना आमदारांना कोंडून ठेवावे लागते, यातूनच काय उगवत आहे हे कळते, असा टोला लगावताना काश्मीर प्रश्नावर बोलण्याऐवजी तुम्ही इथलं सांभाळा, काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

 

Protected Content