Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असून यंदा रमजान ईद व अक्षय तृतीया हे सण एकत्र आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पोलिसांनी रूट मार्च काढला.

महाराष्ट्र राज्य सरकारने १५ मे २०२१ पर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. यादरम्यान रमजान ईद व अक्षय तृतीया हे दोघ जण एकत्र आल्याने बाजारात व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. एकीकडे सरकार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे शहरातील लोक मोठ्या प्रमाणात विनाकारण फिरताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या आदेशावरून (दि.१३ मे २०२१) रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी डीवायएसपी नितीन गणापुरे बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत सपोनि अनिल मोरे, कृष्णा भोये,गणेश धुमाळ,संदीप गोंटला,हरिष भोये तसेच उद्याच्या बंदोबस्तासाठी आलेले आरसीपी एसआरपीएफ पथक अमरावती तसेच होमगार्ड अशांनी भुसावळ शहरातील रेल्वे पोलीस चौकी जवळ एकत्र जमुन जाम मोहल्ला रजा टॉवर खडका चौफुली ईदगाह पर्यंत रूट मार्च काढण्यात आला.

यामागील प्रमुख उद्दिष्ट शासनाने घालून दिलेले निर्देश  तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन व्हावे तसेच आगामी येणारे सण हे घरातच साजरे करावे तसेच शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण व्हावा या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च काढण्यात आला होता.

 

Exit mobile version