Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावठी हातभट्टींवर पोलीसांचा छापा; ९० हजारांचा मुद्देमाल नष्ट

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील गुजदरी गावात सुरू असलेल्या सहा गावठी हातभट्टी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी उध्द्वस्त केले आहे. यावेळी ९० हजारांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबबात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील अति दुर्गम भागात वसलेल्या गुजदरी गावात चाळीसगाव ग्रामीण  पोलीसांनी सहा ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला. यावेळी दारू बनविण्यासाठी कच्चे आणि पक्के रसायन असे एकुण ९० हजारंचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे. दारू तयार करणाऱ्यांचा शोध घेणे सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या सुचनेनुसार अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे, पोहेकॉ युवराज नाईक, ओंकार सुतार, नितीन सोनवणे, गोवर्धन बोरसे, संदीप पाटील, पो.ना. ज्ञानेश्वर बडगुजर यांनी कारवाई केली.

Exit mobile version