Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचारी व त्यांचा मुलगा जखमी झाले. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब नामदेव माळी (वय-४३) रा. श्री रेसिडन्सी अपार्टमेंट, वाटीका श्रम जळगाव हे जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नोकरीला आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता  गुलाब माळी हे मुलगा पियुष माळी यांच्या सोबत दुचाकी (एमएच १९ डीके ९५२५) ने राष्ट्रीय महामार्गावरून घरी जात होते. त्यावेळी मागुन अज्ञात दुचाकीने भरधाव वेगाने येवून जोरदार धडक दिली. या अपघातात गुलाब माळी आणि त्यांचा मुलगा पियुष माळी हे जखमी झाले. अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीधारक घटनास्थळाहून पसार झाला. दोघांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंगळवारी ४ जानेवारी रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

 

 

 

Exit mobile version