Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नारायण राणेंची पत्नी व मुलाच्या विरोधात पोलिसांची लूकआऊट नोटीस

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी निलम राणे आणि पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात पुणे गुन्हा शाखेने कर्जाबाबतच्या खटल्यात लूकआऊट नोटीस जारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून ४० कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी २५ कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत. याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि त्याची देखील ३४ कोटीपर्यंत थकबाकी आहे. डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे.

३ सप्टेंबर रोजी ही लुकआउट नोटीस पाठवली गेली आहे. हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील पाठवलेलं आहे.  मात्र, लुकआट नोटीस जारी होणं म्हणजे आरोपी आहे असं होत नाही. तरी देखील या लुकआउट नोटीसीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

Exit mobile version