कालिंकामाता मंदीराजवळ गुरांचे मांसची वाहतूक करणाऱ्या संशयिताला पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या वाहनातून गुरांचे मांस घेवून जाणाऱ्या वाहनाला एमआयडीसी पोलीसांनी कालिंकामाता जवळ पोलीसांनी ताब्यात घेतले असून एकाला अटक केल्याची घटना रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलीसात आज सोमवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला न्यायालयात हजर केले असतांना १ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

शेख आजम शेख राऊफ (वय-२४) रा. स्वामी नारायण नगर सावदा ता. रावेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

सविस्तर माहिती अशी की, भुसावळ शहरातून जळगावकडे (एमएच ४६ एमआर ०७२९) क्रमांकाच्या वाहतून बेकायदेशीर गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळाली. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सपोनि अमोल मोरे, रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ संजीव किरंगे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना. प्रदीप पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, गोविंदा पाटील, इम्रान शेख आणि पोहेकॉ संजय धनगर यांचे पथक रविवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता शहरातील कालिंकामाता मंदीराजवळ गस्त दिली. त्यावेळी  (एमएच ४६ एमआर ०७२९) क्रमांकाचा ट्रक येत असतांना पोलीसांनी थांबविला. वाहनाची चौकशी केली असता केळीच्या पानाच्या खाली गुरांचे मांस असल्याचे दिसून आले. एमआयडीसी पोलीसांनी वाहन ताब्यात घेवून संशयित आरोपी शेख आजम शेख राऊफ (वय-२४) रा. स्वामी नारायण नगर सावदा ता. रावेर याला अटक केली. आज सोमवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला दुपारी न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

Protected Content