Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीवरून मोबाईल लांबविणारा अल्पवयीन मुलगा पोलीसांच्या ताब्यात

भुसावळ प्रतिनिधी । शहरात रजा टॉवर भागातील मोटारसायकल वरुन मोबाईल हिसकवण्याप्रकरणी संशयित विधी संघषिर्त बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर गुन्हात उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून आज दि.७ ऑगस्ट रोजी १ वाजता भुसावळ शहरात रजा टॉवर भागात यातील संशयित विधी संघषिर्त बालक (वय१५) मुस्लिम कॉलोनी भुसावळ हा गुन्हात वापरलेली 30,000 रू की ची ॲक्टिवा मोबाईलसह मिळून आला आहे. याप्रकरणी शहर पो स्टे मधील भाग 5 गुरन 107/2021 भा द वी कलम – 392,34 प्रमाणे जबरीने मोबाईल हिसकवने बाबत गुन्हा दाखल आहे. 

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोबे व सहा.अनिल मोरे, सहा.पो.निरी.संदीप दुंगगहू नेम भुसावळ शहर पो. स्टे, सहा.फौ.इकबाल पठान, पो.ना. विकास सातदिवे, रमण सुरळकर उमाकांत पाटील पो.का.ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी अशांनी कारवाई केली आहे.

Exit mobile version