Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उत्तर प्रदेश, दिल्लीच्या पोलिसांनी हैदराबाद पोलिसांनाकडून प्रेरणा घेतली पाहिजे : मायावती

mayavati yogi

 

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातही महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पण राज्य सरकार झोपलं आहे. इथल्या आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांनाकडून प्रेरणा घेतली पाहिजे, अशा शब्दात उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी योगी सरकारवरही जोरदार हल्ला चढविला.

 

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर झाल्याच्या घटनेचे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी स्वागत केले आहे. हैदराबाद पोलिसांनी जे काम केले आहे ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवे. उत्तर प्रदेशात सध्या जंगल राज सुरु आहे. दुर्देवं आहे की उत्तर प्रदेशातील आरोपींना राज्याचे पाहुणे असल्यासारखी वागणूक दिली जाते,असेही मायावतींनी म्हटले आहे.

Exit mobile version