रिक्षात विसरलेले लॅपटॉप शोधून पोलीसांनी केले परत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिक्षातून अजिंठा चौफुलीकडे येत असतांना रिक्षात विसलेले लॅपटॉप विसरले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे रिक्षावाल्याचा शोध घेत विसलेले लॅपटॉप मूळ मालकाला परत केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर येथील समाधान अंबादास ठाकरे हे रविवारी १२ जून रोजी सायंकाळी रेल्वेने जळगावला आहे. स्टेशनवर उतरल्यानंतर ते अजिंठा चौफुलीला जाण्यासाठी रिक्षात बसले. यावेळी ते रिक्षात आपले लॅपटॉप विसरुन गेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी इम्रान सैय्यद, सुधीर साळवे यांना रिक्षाचालकाचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. दोघांनी तात्काळ रेल्वे स्थानक परिसरात जावून त्याठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचालकाचा शोध घेतला. जूने जळगाव परिसरातील बालाजी मंदिर परिसरातील नरेंद्र ठाकूर हे असल्याचे कळले. त्यांच्या घरी धाव घेत रिक्षाचालकाने लॅपटॉप परत केले त्यानंतर पोलीस निरीक्षक शिकारे यांच्याहस्ते हे लॅपटॉप समाधान ठाकरे यांना परत करण्यात आले.

Protected Content