Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे विना हेल्मेट वाहन चालकांवर पोलिसांची धडक कारवाई

रावेर, प्रतिनिधी । शहरातील डॉ. आंबेडकर चौकामध्ये विना हेल्मेट वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांनी १३३ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 

 

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत डीवायएसपी पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, एपीआय शितलकुमार नाईक व पोलीस कर्मचारी होते. तसेच आरसीपीचे कर्मचारी मिळून रावेर येथे डॉ. आंबेडकर चौकात विना हेल्मेट मोटरसायकल चालकांवर ऑनलाईन मोटर वाहन कायद्याप्रमाणे धडक कारवाई करण्यात आली. यात 133 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक मोटरसायकल चालकाने हेल्मेट चा वापर करावा,” सर सलामत तो पगडी पचास” खूप मोठ्या प्रमाणात अपघात होऊन वाहन चालकाचे जीव जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने हेल्मेट वापरून स्वतः चे व दुसऱ्याचेही संरक्षण करावे, यापुढे नियमित विनाहेल्मेट तपासणी राहणार आहे व ऑनलाइन दंडात्मक कारवाई करणार आहोत, त्यामुळे हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन करीत आहेत.

Exit mobile version