Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘बनावट आरटीपीसीआर’ प्रकरणात अटकेतील संशयिताला पोलीस कोठडी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पैसे घेवून स्वॅब न घेता बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट देणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

बुधवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पैसे घेवून स्वॅब न घेता बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट देणाऱ्या दोघांना दुपारी न्यायालयात हजर केले असता एकाला दि.१२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती. या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार केला. एकूण ३८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राजेंद्र विठ्ठल दुर्गे रा.जळके, विटनेर ता.जि.जळगाव आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडूरंग पाटील रा.जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी राजेंद्र विठ्ठल दुर्गे याला अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती व्ही.व्ही.मुगलीकर यांच्या न्यायालयात संशयित आरोपीला बुधवार, दि. ९ फेब्रुवारी रेाजी दुपारी न्यायालयात हजर केले असता १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

Exit mobile version