Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई : एकास अटक दुसरा फरार

रावेर, प्रतिनिधी ।  वाळूची अवैध वाहतुक करणा-या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर  पोलिस प्रशासनाने धकड कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एक आरोपी अटक असून एक जण फरार आहे.

या बाबत वृत्त असे की ट्रक्टर क्र. MH 19 BG 4473  या निळ्या रंगाचे ट्रँक्टरमध्ये शासनाची परवानगी नसताना एक ब्रास गौण खनिज (वाळू ) ट्रॅक्टरमध्ये भरुन चोरटी वाहतूक करतांना रसलपूर गावाकडुन रावेर शहरात येणाऱ्या कच्च्या रस्त्याने लेंडीपुर भागामध्ये महादेव मंदिरा समोर पकडण्यात आले आहे. याबाबत रावेर पोलिस स्थानकात भादवी कलम 379  महाराष्ट्र जमीन महसूल कायदा कलम 48 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २  लाख ३  हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. महेंद्र सुरवाडे हे करीत आहेत. या प्रकरणी स्वप्निल महाजन (वय 24 रा. आटवडे) याला अटक करण्यात आली असून  कैलास महाजन (रा. आटवडे) फरार आहे.

 

Exit mobile version