Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशा करण्यासाठी सायकल चोरून विकणारा पोलिसांच्या ताब्यात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नशा हि माणसाच्या चुकीच्या वाटेकडे घेऊन जात असते. शनिपेठ पोलिसांनी सायकल चोरी करून विकणाऱ्या १९ वर्षीयला ताब्यात घेतले असून बॉंडचा नशा करण्यासाठी तो हे कृत्य करत असल्याचे उघडकीस आले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की,बालाजी पेठेतील अजय मुंगड यांची सायकल मंगळवार, दि. २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता. बालाजी पेठेतील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यावर त्यात शहरातील रिधूरवाडा येथे राहणारा ओमकार योगेश सोनवणे हा १९ वर्षीय तरून सायकल चोरताना दिसून आला.  

शनिवारी रात्री शनिपेठ पोलिसांनी ओमकार याला अटक करून त्यांच्याजवळून तीन सायकली हस्तगत केल्या. त्याने बाँडच्या नशा करण्यासाठी आपण सायकल चोरून त्या कमी किंमतीत विक्री करत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याजवळून चोरीच्या तीन सायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यास रविवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलीस कर्मचारी राहुल घेटे, राहुल पाटील, अनिल कांबळे आणि मुकुंद गंगावणे यांनी केली.

Exit mobile version